Copyright © 2007 Red Hat, Inc. आणि इतर [1]
या दस्तावेजात खालील विषय समाविष्ट आहेत:
प्रतिष्ठापना संबंधी टिपा
अद्यावत
ड्राइवर अद्ययावत
कर्नल विषयी अद्ययावत
इतर अद्ययावत
तंत्रज्ञान पूर्वदृश्ये
निर्धारीत मुद्दे
ज्ञात मुद्दे
Red Hat Enterprise Linux 5.1 विषयील काही अदययावते प्रकाशन टिपांच्या या आवृत्तीत आढळणार नाहीत. प्रकाशन टिपांची अद्ययावत आवृत्ती खालील URL वर उपलब्ध असू शकते:
http://www.redhat.com/docs/manuals/enterprise/RHEL-5-manual/index.html
खालील विभागात एनाकोंडा विषयी व Red Hat Enterprise Linux 5.1 विषयी माहिती सांगतो.
आधीच प्रतिष्ठापित असलेल्या Red Hat Enterprise Linux 5 यांना सुधारित करण्यासाठी, तुम्ही त्या बदललेल्या संकुलांस अद्ययावत करण्यासाठी Red Hat संजाळ चा वापर केलाच पाहिजे.
Red Hat Enterprise Linux 5.1 चे ताजे प्रतिष्ठापन करण्यासाठी किंवा नविनतम अद्ययावत आवृत्ती पासून Red Hat Enterprise Linux 5 मध्ये सुधारणा करण्यासाठी तुम्ही Anaconda चा वापर करू शकता.
जर तुम्ही Red Hat Enterprise Linux 5 CD-ROMs मधील समाविष्टांस प्रतिलिपीत करत असाल (उदाहरणार्थ, संजाळ-आधारित प्रतिष्ठापनाची तयारी करताना) तर फक्त कार्यकारी प्रणाली साठी प्रतिलिपी करण्याची खात्री असू द्या. अगाऊ CD-ROM, किंवा कोणतेही स्तरीय उत्पाद CD-ROMs प्रतिलिपी करू नका, कारण ते Anaconda च्या योग्य कार्यास आवश्यक अशा फाइल्स पुन्हा लिहून टाकेल. Red Hat Enterprise Linux प्रतिष्ठापित झाल्या नंतरच हे CD-ROMs प्रतिष्ठापित करावेत.
Red Hat Enterprise Linux 5.1 प्रतिष्ठापित झाल्यावरच अगाऊ CD-ROM व इतर स्तरीय CD-ROMs च्या यादीचे प्रतिष्ठापन करावे.
पूर्णतः आभासीत अतिथी खात्यावरील Red Hat Enterprise Linux 5.1 प्रतिष्ठापन करतेवेळी, kernel-xen कर्नलचा वापर करू नका. असे केल्यास कार्यप्रणाली यशस्वीरीत्या चालणार नाही.
Red Hat Enterprise Linux 5.1 पूर्णतः आभासीत अतिथी खात्यावरील प्रतिष्ठापन करतेवेळी जर आपण प्रतिष्ठापन क्रमांकाचा वापर करत असाल, तेव्हा आभासीकरन संकुल निवडायचा नाही याची खात्री घ्या. आभासीकरन संकुल kernel-xen कर्नल प्रतिष्ठापीत करतो.
लक्षात घ्या अप्रत्यक्षित अतिथी खात्यांवर ह्याचा प्रभाव पडत नाही. अप्रत्यक्षित अतिथी खात्यांवर नेहमी kernel-xen कर्नलचा वापर करतात.
जर आपण Red Hat Enterprise Linux 5 पासुन ते 5.1 अशी सुधारणा करतेवेळी आभासीत कर्नल वापरत असाल, तर सुधारणा यशस्वीरीत्या झाल्यास पुन्हा सुरू करा.
Red Hat Enterprise Linux 5 व 5.1 चे हायपरवाइजर ABI-संलग्न नाही. जर सुधार होतेवेळी आपण पुनः सुरू करत नासाल, तर सुधारीत आभासी RPMs व कार्यरत कर्नल एकसारखे राहणार नाही.
iSCSI प्रतिष्ठापन व बूट सर्व प्रथम Red Hat Enterprise Linux 5 मध्ये तंत्रज्ञाण पूर्वदृश्य या स्वरूपात परिचयास आले. ही विशेषता आता पूर्णतः समर्थित आहे पण खालील निर्बंधाप्रमाणे.
खालील निगडीत असल्यास ह्या कार्यशीलतेचे तीन स्वरुपन आहे:
हार्डवेअर iSCSI प्रबंधकचा (उदाहर्णाथ QLogic qla4xxx) वापर केल्यास
iSCSI (उदाहर्णाथ iSCSI बूट फर्मवेअर, किंवा iSCSI बूट कार्यशील असलेला मुक्त फर्मवेअरची आवृत्ती) करीता फर्मवेअर बूट आधार देणारी कार्यप्रणालीवर open-iscsi प्रबंधकाचा वापर केल्यास
iSCSI करीता फर्मवेअर बूट आधार न देणारी कार्यप्रणालीवर open-iscsi प्रबंधकाचा वापर केल्यास
हार्डवेअर iSCSI प्रबंधकचा वापर केल्यास, आपण कार्डच्या BIOS कार्यक्रमाचा IP पत्ता नोंदणीकरीता व इतर घटक कुठूणही साठविण्याकरीता वापरू शकतो. घटक कुठूणही साठविण्याकरीता लागणारी तुर्कदृष्ट्या घटके ऍनाकोंडामध्ये मूलभूत sd साधन, कुठलेही कार्यरचना न लागणारी, आढळतील.
दूर संच सेव्हर ची रचना करण्यासाठी जर प्रबंधकाचे रचनात्मक नाव (IQN) ओळखण्याची गरज पडल्यास, खालील रीत्या प्रतिष्ठापन करावे:
प्रतिष्ठापन करण्याकरीता कुठले डीस्क ड्राइव्ह वापरायचे यासाठी प्रतिष्ठापन पृष्ठावर जावे.
वर क्लिक करा.
वर क्लिक करा.
iSCSI IQN त्या पडद्यावर दर्शविल्या जाईल.
iSCSI करीता सक्षम व फर्मवेअर बूट आधार प्रदान करणाऱ्या open-iscsi सॉफ्टवेअर प्रबंधकचा वापर केल्यास, आपण फर्मवेअरच्या सेटअपा BIOS कार्यक्रमाचा IP पत्ता नोंदणीकरीता व इतर घटक कुठूणही साठविण्याकरीता वापरू शकता. असे केल्यास कार्यप्रणाली दूर iSCSI संचयनपासून बूट होण्यास सक्षम होते.
सध्या, ऍनाकोंडा फर्मवेअरकडील असलेल्या iSCSI माहितीस प्रवेश नाही. याएवजी, प्रतिष्ठापनेळी ठराविक IP पत्ता स्वतः नोंदणी करावी. याकरीता, वरील रीत्या IQN चे प्रबंधक निश्चित करा. त्यानंतर, IQN दर्शविणाऱ्या प्रतिष्ठापनकरीता प्रतिष्ठापन पृष्ठावरच, निश्चित केलेल्या iSCSI लक्षवर IP पत्ता नोंदवा.
स्वतः IP पत्ता iSCSI करीता निश्चित केल्यावर, iSCSI लक्ष्यावरील प्रतिष्ठापन करीता लगणारी घटके उपलब्ध होतील. iSCSI लक्ष्य करीता लगणारी IQN व IP पत्ता ऍनाकोंडा आपल्या initrd च्या मदतीने प्राप्त करतो.
जर भावी वेळेत iSCSI लक्ष्याचे IQN किंवा IP पत्त्यात बदल झाला, तेंव्हा प्रत्येक प्रबंधकावरील iBFT किंवा मुक्त संरचना कार्यक्रम नोंद करून त्यातील घटकांची बदल करा. त्यानंतर, प्रत्येक प्रबंधकाकरीता initrd (iSCSI संचयनात संचयीत केलेले) खालील प्रमाणे संपादन करा:
gunzip चा वापर करून initrd वापरा.
cpio -i आदेश चालवा.
init फाइलीत, iscsistartup ही ओळ शोधा. ह्या ओळीत iSCSI लक्ष्याकरीता IQN व IP पत्ता देखील असतो; ज्याला नव्या IQN व IP पत्त्याने सुधारीत करावे.
cpio -o वापरून एनक्रप्टेड खंड बनवा.
gunzip वापरून initrd ला पुनः संकोचन करा.
कार्यकारी प्रणाली ची मुक्त फर्मवेअर / iBFT फर्मवेअर कडून iSCSI विषयी माहिती प्राप्त करण्याची शैली भावी प्रकाशना करीता ठरविली जाते. ज्यावेळी iSCSI लक्ष्यतील IP पत्ता किंवा IQN मध्ये बदल होतो त्यावेळी अशी सुधारणा प्रत्येक प्रबंधकेकरीता initrd (iSCSI संचयनात संचयीत केलेले) तेंव्हा संपादनची गरज नाहीसी केली जाते.
जर आपण iSCSI करीता फर्मवेअर बूट आधार विना प्रणालीवर open-iscsi सॉफ्टवेअर प्रबंधक वापरत असाल तर, (PXE/tftp सारखी) नेटवर्क बूट चा वापर करा. iSCSI लक्ष्य करीता IQN प्रबंधक व IP पत्ता ओळखण्यासाठी वरील पद्घत चा उपयोग करा. ये काम संपल्यास, नेटवर्क बूट सर्वर वर initrd ची प्रत बनवा व नेटवर्क बूट करीता प्रणाली पुनः सुरू करा.
याचप्रकारे, जर IP पत्ता किंवा iSCSI लक्ष्यकरीता IQN मध्ये बदल जाल्यास, initrd चे त्यानुसारे संपादन करा. हे करण्यासाठी, प्रत्येक प्रबंधकारीता initrd चा वरील संपादकीय पद्धितीचा वापर करा.
EXT3 ची कमाल क्षमता आता 16TB (8TB पासून वाढीवरीत्या). आहे. ही वाढ सर्वप्रथम Red Hat Enterprise Linux 5 मध्ये तंत्रज्ञान पूर्वदृशीय ह्या स्वरूपात उदयास आले व आता ह्या अद्ययावतात पूर्णपणे समर्थित आहे.
फक्त सुरक्षा अद्ययावत प्रतिष्ठापित करणे सुद्धा आता yum द्वारे शक्य होऊ शकते. हे करण्याकरीता, yum-security हा वाढीव कार्यक्रम प्रतिष्ठापित करा व खालिल आदेश लिहा:
yum update --security
एका क्लस्टरातील वरिष्ठ सेवा खंडीत न पाडता आता एका स्त्रोतला पुनः सुरू करणे शक्य आहे. याची रचना /etc/cluster/cluster.conf मध्ये एका कार्यरत नोड वर __independent_subtree="1" गुणधर्म चा वापर करून एक स्वतंत्र स्त्रोतास ओळखण्याकरीता केला जाऊ शकतो.
उदाहरणार्थ:
<service name="example"> <fs name="One" __independent_subtree="1" ...> <nfsexport ...> <nfsclient .../> </nfsexport> </fs> <fs name="Two" ...> <nfsexport ...> <nfsclient .../> </nfsexport> <script name="Database" .../> </fs> <ip/> </service>
येथे, दोन फाइल प्रणालींचे स्त्रोत वापरल्या गेले आहेत: पहिला व दूसरा. पहिला अयशस्वी झाल्यास, दूसऱ्याचे कार्य खंडीत न पाडता पुनः सुरू होतो. दूसरा अयशस्वी झाल्यास, सर्व घटक (पहिला, पहिल्याचे व दूसऱ्याचे उपघटक) पुनः सुरू होतात. कुठल्याही क्षणी दूसरा व त्याचे उपघटक पहिल्याकडून पूरवलेल्या स्त्रोतांचा वापर करीत नाही.
लक्षात घ्या सांबा सेवेला विषेश सेवा रचनेची गरज लागते, व त्याचप्रमाणे स्वतंत्र उपकार्यशैलीस त्याचा वापर होत नाही. हे इतर स्त्रोतांकरीताही करं आहे, त्यामुळे __independent_subtree="1" गुणधर्मचा सावधतेने वापर करा.
खालील अप्रत्यक्षकरण अद्यावत सुद्धा या प्रकाशनात समाविष्ट केलेले आहेत:
अप्रत्यक्षीतीत कर्नल यापुढे kdump फंक्शन वापरू शकतो.
AMD-V आता या प्रकाशनात समर्थित आहे.ह्यामुळे पूर्णः आभासी अतिथींकरीता प्रत्यक्ष क्षेत्र स्तानांतर कार्यक्षम होते.
पूर्णः आभासी कर्नल आता 256GB RAM पर्यंत समर्थन देतो.
in-kernel सॉकेट API आता वाढीवरीत्या कार्यरत आहे. ह्यामुळे अतिथी खातेंकरीता sctp आदेश वापरतेवेळी येणाऱ्या त्रूटीचे निर्धारण होण्यास मदत होते.
आभासी संजाळ आता libvirt आभासी लायब्ररी, चा भाग आहे. libvirt कडील आज्ञावली प्रणालींवर स्थानीक अतिथी खात्यांकरीता NAT/राऊटर व वैयक्तिक संजाळची संरचना करते. खाती ज्यांकरीता बाहेरील राऊटींगची गरज पडत नाही त्यारकीता वरील संरचना लाभदायक ठरते. लॅपटॉपवरील आभासीकरण वापरणाऱ्या डेवेलपर्सकरीता सुद्धा उपयोगी ठरते.
लक्षात घ्या आभासी संजाळ कार्यशैली dnsmasq वर अवलंबून राहते, जे आभासी संजाळ करीता dhcp ला हाताळते.
libvirt विषयी अधिक माहितीकरीता, तीसाठी, कृपया http://libvirt.org तपासा.
libvirt आता अकार्यक्षम आभासी प्रणालीचे व्यवस्थापन करतो. हे काम libvirt डोमेन न थांबवता किंवा सुरू करता निश्चित व अनिश्चित करतो.ही कार्यपद्धिती virsh define व virsh undefine आदेशसमानच कार्य करतात.
ही सुधारणा Red Hat आभासी कार्यप्रणाली व्यवस्थापकास सर्व उपलब्ध अतिथी खाती दर्शविण्यास परवानगी देतो. यामुळे थेट GUI पासूनच ही अतिथी खाती सुरू करण्यास मदत करतो.
kernel-xen संकुल यापुढे प्रस्थापीत केल्यावर, elilo.conf चुकीच्या / अपूऱ्या पद्धतीने तैयार होत नाही.
पूर्णतः आभासित अतिथी यापुढे जलद स्थलांतर समर्थीत राहतील.
xm create आदेश आता virt-manager रीत्या चखत्रलेख समतुल समर्थन करतो.
Nested Paging (NP) आता समर्थित आहे. ही विषेशता आभासी वातावरणातील स्मृती व्यवस्थापनाचा अवघडपणा कमी करतो. याच्या व्यतिरीक्त, NP स्मृती-केंद्रित अतिथी खात्यांमधील CPU चा वापर देखील कमी करतो.
यावेळी, NP मूलभूतरीत्या समर्थित नाही. आपली प्रणाली NP समर्थित असल्यास, असे सुचविले जाते की, NP समर्थित करण्याकरीता हायपरवायजरला hap=1 ह्या घटकाशी बूट कले जावे.
ह्या आभासीकरण विशेषता संबंधी अद्ययावतात 64-bit यजमानावर 32-bit अतिथी खाती प्रतिष्ठापित व कार्यरत करण्याची सुविधा देखील अंतर्गत केली आहे. तरीसुद्धा, ही कार्यशैली तंत्रज्ञान पूर्वदृश्य स्परूपात, उतपादनास समर्थित नाही.
सहभागीय पेज टेबल आता hugetlb स्मृतीकरीता सक्षम आहे. यामुळे पेज टेबलात नोंदणीकृत बहु प्रक्रियेस सहभागी होण्यास शक्य होते.
बहु प्रक्रियेस पेज टेबलात नोंदणीकृत सहभागीकरणामुळे कमी कॅशचा वापर होतो. यामुळे कार्यक्रमाचा कॅश हीट गुणोत्तरात वाढ होते, ज्यामुळे कार्यक्रमाची कर्यक्षमतेतही वाढ होण्यास मदत मिळते.
tick_divider=<value> पर्याय हा एक sysfs घटक आहे जे आपल्याला प्रणालीतील घड्याळ्याचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यास मदत करतो जरी उपयोगकर्ताचे कार्यक्रमांच्या HZ वेळेची संख्या देखील सुस्थितीत ठेवण्यास मदत होते.
tick_divider= पर्याय वापरल्याने CPU च्या कार्यपद्धतीत सुस्थितीपन व कार्यक्षमतेत वाढ होते त्याबरोबर प्रणालीची वेळ पद्धती व संरचनात्मक अचूकपणाही बऱ्याच प्रमाणातही कमी करतो.
मानक 1000Hz क्लॉक करीता उपयोगी <values>:
2 = 500Hz
4 = 250Hz
5 = 200Hz
8 = 125Hz
10 = 100Hz ( Red Hat Enterprise Linux च्या पूर्वीच्या प्रकाशनात वापरलेली संख्या)
लक्षात घ्या आभासी कर्नल अतिथी खात्यांवरील बहु वेळांक प्रमाण असमर्थित आहे. dom0 एक ठराविक वेळ प्रमाण सर्व खात्यांकरीता वापरतो; ज्यामुळे बहु वेळांक प्रमाणामुळे उदयास येणारे ओझे कमी होते.
ऍनाकोंडास आता dm-multipath यंत्रे शोधणे, निर्माण करणे, आणि प्रतिष्ठापित करणे या क्षमता आहेत. हे वैशिष्ट्य कार्यान्वित करण्यासाठी, mpath पॅरामीटर कर्नल बूट ओळीवर टाका.
ही विषेशता सर्वप्रथस Red Hat Enterprise Linux 5 तंत्रज्ञान पूर्वदृश्य स्परूपात उदयास आला, व ह्या प्रकाशनात पूर्णपणे समर्थित आहे.
लक्ष्यात घ्या dm-multipath Dell MD3000 करीता आगत विशेषता समर्थित आहे. तरी, बहुसंख्यी नोडस् जी dm-multipath चा वापर MD3000 वरील प्रवेश करीता केला जातो झटपट येणाऱ्या अनिश्चितेच्या निर्धारण्यास अयशस्वी ठरतो.
यापुढे, जर आपल्या प्रणालीस बहुमार्गी व न बहुमार्गी साधणे असतील तर ऍनाकोंडा मधील संवादपटाचा आपण वापर करणे असे सुचविले जाते. वापर करतेवेळी समान निश्चित संचयन गटामधील दोन्ही प्रकारचे साधन उदयास येऊ शकतात.
सध्यस्तिथीत, खालील निर्बंध या विशेषताकरीता लागू होतात:
Logical Unit Number (LUN) ला बूट करीता एकच मार्ग असल्यास, एनाकोंडा SCSI साधणावर प्रतिष्ठापन करतो जरी mpath निश्चित केले असेल. (LUN) बूट करण्याकरीता बहू मार्ग समर्थित केल्यारही व initrd पुनः बनविल्या नंतरही, कार्यकारी प्रणाली dm-multipath साधणा व्यतिरीक्त SCSI साधणा पासून देखील बूट करण्यचा प्रयत्न करू शकतो.
तरी, LUN बूट करण्यासाठी बहु मार्ग असल्यास, ऍनाकोंडा यशस्वीरीत्या परस्पर dm-multipath साधणावर mpath कर्नल बूट लाइन निश्चित केल्यावर प्रतिष्ठापित करतो.
मूलभूतपणे, multipath.conf मध्ये user_friendly_names होय करीता निश्चित केला गेला आहे. ही संरचना dm-multipath रूट साधणाकरीता जरूरी आहे. तरी, user_friendly_names ला नाही अशी संरचना केल्यास व initrd पुनः उदयास आणल्यावर खालील बूट त्रूटी अस्तित्वात येते:
फाइलप्रणाली तपासत आहे fsck.ext3: /dev/mapper/mpath0p1 उघडतेवेळी फाइल किंवा संचिका आढळली नाही
SAN डीस्क साधणापासून बूट होण्याची कार्यक्षमता आता समर्थित आहे. या बाबतीत, SAN फायबर मार्ग किंवा iSCSI संवादपटाची मदत घेतो. ही कार्यशैली प्रणाली-ते-संचयन बहु मार्गे dm-multipath वापरून जुळवणीकरीता विशेषता आधार देतो.
बहु यजमान संचार अडॅपटर (HBA) चा वापर करणाऱ्या संरचनांकरीता, सध्या कार्यरत असलेला अडॅपटराद्वारे उपलब्ध सर्व मार्ग अकार्यक्षम झाल्यास दूसऱ्या अडॅपटरापासून प्रणाली BIOS निश्चित करण्याची गरज आपल्याला भासेल.
ह्या अद्ययावतात, nfsroot पूर्णपणे समर्थित आहे. यामुळे वापकर्ते Red Hat Enterprise Linux 5.1 वापरू शकतात ज्याची रूट फाइल प्रणाली (/) NFS द्वारे माऊंट होते.
nfsroot सर्वप्रथम Red Hat Enterprise Linux 5 मध्ये तंत्रज्ञान पूर्वदृश्य ह्या स्वरूपात आगमनास आले बिनस्तरीय लीनक्स. बिनस्तरीय लीनक्सच्या पूर्णतः वापरणीस एक तंत्रज्ञान पूर्वदृश्यच्या रूपातच स्वीकारले जाते.
सध्या, nfsroot वर खालील निर्बंध आहेत:
प्रत्येक क्लाएंटला NFS सर्वरील आपले स्वतःचे रूट फाइल प्रणाली असणे जरूरी आहे. ही निर्बंधी फक्त-वाचा रुट वापरकर्त्याला सुद्धा लागू होतो.
NFS वर SWAP समर्थित नाही.
nfsroot क्लाएंट वर SELinux समर्थित होऊ शकत नाही. साधारणतः, Red Hat SELinux ला असमर्थित करण्यास सुचवित नाही. तरी, वापरकर्त्यांनी ह्या कृतीची सुरक्षात्मक दृश्टीने योग्यती तपासनी घ्यवी.
nfsroot ला संरचीत करण्याकरीता खालिल पद्धती पहा. ही कार्यपद्धती आपले संजाळ साधण eth0 व परस्पर संजाळ ड्रायवर tg3 आहे असे गृहीत धरतो. तरी आपण आपल्या प्रणालीच्या संरचना आपल्या गरजेनुसार बदलावे:
खालील आदेश वापरून आपल्या संचिकेमध्ये initrd बनवा:
mkinitrd --with=tg3 --rootfs=nfs --net-dev=eth0 --rootdev=<nfs server ip>:/<path to nfsroot> ~/initrd-<kernel-version>.img <kernel-version>
Red Hat Enterprise Linux 5.1 कर्नलचा वापर करूनच initrd बनवावी.
पुढे, पूर्वीच उत्पादीत initrd पासून उदयास आलेली zImage.initrd प्रतिलीपी तयार करा. zImage.initrd हा एकाच प्रतिलीपीत एक संकुचीत कर्नल व initrd आहे. खालील आदेश वापरा:
mkzimage /boot/System.map-<kernel-version> ~/initrd-<kernel-version>.img /usr/share/ppc64-utils/zImage.stub ~/zImage.initrd-<kernel-version>
तयार झालेले zImage.initrd-<kernel-version>tftp वरील सर्वर वरील एका ठिकाणी स्थानांतरीत करा.
nfs सर्वरवरील निर्यातकेलेली nfsroot फाइल प्रणालीत जरूरी त्या बायनरी व घटक अस्तित्वात आहे याची खात्री घ्या. ह्या बायनरी व घटक पहिल्या टप्प्यात initrd बनविण्याकरीता वापरण्यात आलेल्या कर्नल आवृत्तीशी परस्पर असायसा हवीत.
DHCP सर्वररील क्लाएंटला लक्ष्य zImage.initrd-<kernel-version> कर्ता नियंत्रीत करण्याकरीता संरचीत करा.
हे करण्याकरीता,DHCP सर्वरच्या /etc/dhcpd.conf फाइल मध्ये खालील अर् समाविष्ठ करा :
next-server <tftp hostname/IP address>; filename "<tftp-path>/zImage.initrd";
लक्ष्यात घ्या <tftp-path> ने zImage.initrd करीता tftp-निर्यतीत संचिकेच्या अंतर्गत मार्ग निश्चित केला पाहिजे. उदाहरणार्थ, जर zImage.initrd करीता पूर्णतः मार्ग /tftpboot/mykernels/zImage.initrd असा आहे व /tftpboot/ ही tftp-निर्यातीत संचिका असल्यास, <tftp-path> हा मार्ग mykernels/zImage.initrdअसला पाहिजे.
अखेरीस, संजाळ साधणापासून बूट होण्याकरीता आपल्या कार्यप्रणालीचे बूट संपादन घटके निश्चित करा ( ह्या उदाहरणात, eth0 नेटवर्क साधण म्हणून घोशीत आहे).
GFS2 ही GFS ची एक वाढीव प्रगती आहे. ही अद्ययावत बरेचश्या डीस्क-वर असणाऱ्या फाइल प्रणालीकरीता आहे. GFS फाइल प्रणाली gfs2_convert कार्यक्रमासह GFS2 मध्ये स्थानांतरीत करता येते, ज्यामुळे GFS फाइल प्रणालीची मेटाडेटाविषयी अद्ययावत परस्पररीतीने होतात.
GFS2 प्रथमवेळी Red Hat Enterprise Linux 5 करीता तंत्रज् पूर्वदृश्य, व आता ह्या अद्ययावतात पूर्णपणे समर्थित आहे. बंचमार्क परिक्षा खालिल करीता जास्त कार्यक्षमतेचा निशकर्ष देतो:
एकाच संचिकेचा सर्वात जास्त वापर व जास्तवेळी होणारी तपासणी (पोस्टमार्क बेंचमार्क)
एकाचवेळी I/O कार्यक्रम (fstest बेंचमार्क परिक्षा संदेशवाहक TIBCO कार्यक्रमांकरीता एक सुव्यवस्थित कार्यक्षमतेचे लक्षण आहे)
कॅशड् रीडस्, यावेळी तरी कुठलेही सुरक्षाहेतु ओझे नाही
पूर्वनिश्चित फाइल
NFS फाइल हातळणीकरीता लुकअपस्
df, प्रदानीय माहिती आता कॅशड् आहे
याच्या व्यातिरीक्त, GFS2 मध्ये खालील विशेषता देखील आहेत:
मेटाडेटाच्या व्यतिरिक्त जरनल्स् आता साधे (जरी अदृश्य) फाइलस् आहेत. जरनल्स् आता आपण मनासारखे संरचीत करून समाविष्ट करू शकतो तरी वाढीव सर्वरस् वर फाइल प्रणाली माऊंट केली असते.
कोटा आता समर्थित व असमर्थित करणे माऊंट पर्याय द्वारे quota=<on|off|account> शक्य आहे
quiesce ची यापुढे क्लस्टरवर त्रूटी निर्धारणाकरीता जरनल्सला पुनः वापरण्याची गरज नाही
नॅनोसेकंद वेळशिक्कामोर्तब आता समर्थित आहे
ext3 सारखेच, GFS2 आता data=ordered माध्यमास समर्थित आहे
गुणधर्म संरचना lsattr() व chattr() आता मानक ioctl() द्वारे समर्थित आहे
16TB वरील आकाराच्या फाइल प्रणालीला आता समर्थित आहे
GFS2 ही एक मानक फाइल प्रणाली आहे, व विना क्लस्टर संरचनांकरीता वापरही केला जातो
Driver Update Program (DUP) तिसऱ्या-पक्षांकडील विक्रेत्यांना (उदाहरणार्थ OEMs) त्यांचे स्वतःचे साधणकरीता ड्रइवर व इतर लीनक्स कर्नल घटक Red Hat Enterprise Linux 5 प्रणालींमध्ये नियमीत RPM संकुल प्रकाशीत संचिकेच्या स्वरूपात समाविष्ट करण्याकरीता तयार केले होते.
Red Hat Enterprise Linux 5.1 DUP करीता, बरेचश्या विशेष व अनेक अद्ययावत नियंत्रित करतो:
प्रतिष्ठापने-वेळी ड्राइवर अद्ययावत RPMs ड्राइवर अद्ययावत डीस्कस् द्वारे आता समर्थित आहे
बूटमार्गे ड्राइवर अद्ययावत ज्यामुळे प्रणालीची बूटमार्ग प्रभावित होते यापुढे समर्थित आहे
तिसऱ्या-पक्षांकडील Advanced Linux Sound Architecture (ALSA) संकुल करीता यापुढे आधार काढून घेतला आहे
पुढेस इतर अद्ययावत तपासलेल्या कर्नल ABI प्रतिरूप वाईटलीस्टकरीता नियंत्रीत केले गेलीत. ही वाईटलीस्ट संकुल ड्राइवरांकडून कर्नल द्वारे पुरविलेल्या कुठल्याविशेष प्रतीकृती व डाटा स्ट्रकचर जी तिसऱ्या-पक्षांकडील ड्राइवरास वापरण्याजोगी आहे हे ओळखण्याकरीता वापरला जातो.
अधिक माहितीसाठी, http://www.kerneldrivers.org/RedHatKernelModulePackages वर जावे.
acpi: लेनोवो लॅपटॉप संबंधी ACPI व डॉकींग स्टेशन विषयीच्या बहुतांश समस्यांचे निर्धारण करण्याकरीता ibm_acpi घटकास अद्ययावत केले आहे.
ipmi: बेसबोर्ड व्यवस्थापन नियंत्रक करीता नमोद केलेले हार्डवेअरास kthread पोलींग यशस्वारीत्या होत नाही.
sata: SATA/SAS ची 2.6.22-rc3 ही सुधारीत आवृत्ती आहे.
openib व openmpi: ची सुधारीत OFED (OpenFabrics Enterprise Distribution) आवृत्ती 1.2 आहे.
powernow-k8: ची सुधारीत आवृत्ती 2.0.0 Greyhound ला पूर्ण आधार प्रदान करण्यास सक्षम आहे.
xinput: पूर्णतः RSA समर्थन प्राप्त करण्यासाठी समाविष्ठीत.
aic94xx: ची 1.0.2-1 ही सुधारीत आवृत्ती, एमबेडेड सीक्वेंसर फर्मवेअरच्या सुधारीत आवृत्ती v17 शी परस्पर आहे. हे अद्ययावत खालील बदलांकरीता संलग्न आहे:
ascb कार्यप्रणालीवरील वाढीव कार्यक्रमांकरीता रेस स्तिथीचे निर्धारण झाले
REQ_TASK_ABORT व DEVICE_RESET हाताळणी समाविष्ठीत झाले
बाहेरील पोर्ट आता पूर्पपणे त्रूटी आढळल्यावर कार्यरत आहे
phys आता sysfs द्वारे समर्थित व असमर्थित कर्ता येते
DDB करीता रेस स्तिथी प्रतिबंधीत करण्यासाठी DDB सुरक्षेतेचा वाढीव उपयोग
ALSA ची 1.0.14 ही सुधारीत आवृत्ती आहे. ही अद्ययावत खालिलरीत्या सुस्तिथीपणास कारणीभूत आहे:
IBM Taroko (M50) वरील ध्वनी संबंधी अडचन यशस्वीरीत्या निर्धारीत केली गेली आहे
Realtek ALC861 आता समर्थित आहे
xw8600 व xw6600 वरील म्यूटींग समस्या निर्धारीत करण्यात आली आहे
ADI 1884 Audio आता समर्थित आहे
xw4600 वरील ध्वनी संरचीत समस्याचे निर्धारण करण्यात आले आहे
PCIX व PCI-एक्सप्रेस करीता कमाल वाचक विनंती आकार संरचीत करण्याकरीता फंक्कशन कॉल समाविष्टीत आहे
IBM System P प्रणाली आता PCI-Express hotplugging समर्थित आहे
SB600 SMBus ला समर्थन करण्याकरीता जरूरी ड्रायवरस् व PCI ID समाविष्ट करण्यात आली आहे
e1000 ड्रायवर: I/OAT-समर्थित चीपसेट ला आधार देण्याकरीता 7.3.20-k2 ही सुधारीत आवृत्ती आहे.
bnx2 ड्रायवर: 5709 हार्डवेअरला आधार देण्याकरीता 1.5.11 ही सुधारीत आवृत्ती आहे.
B44 ईथरनेट ड्रायवर: खालिल बदलांकरीता अपस्ट्रीस आवृत्ती 2.6.22-rc4 पासुन बॅकपोर्ट केले:
बहु endianness चे निर्धारन केल्या गेले आहे
DMA_30BIT_MASKचा अखंड आता वारणीत आहे
skb_copy_from_linear_data_offset() आता वापरणीत आहे
आता spin_lock_irqsave() मध्ये सुरक्षितरीत्या अडचन असमर्थित करण्याची विषेशता आहे
पुनः कार्य करतेवेळी साधी त्रूटीकरीता तपासनी होते
बहुप्रकाशनाकरीता अनेक निर्धारण वापरल्या गेले
अनुमानापेक्षा जास्त वेळ चीप पुनः संरचीत करतेवेळी लागते
Marvell sky2 ड्रायवर: ifup/ifdown आदेश पुन्हा कार्यान्वित करतेवेळी उदयास येणाऱ्या कर्नल पॅनीक त्रूटीचे निर्धारणकरीता ड्रायवर 1.14 ची आवृत्ती सुधारीत करण्यात आली आहे.
forcedeth-0.60 ड्रायवर: ला ह्या प्रकाशनात समाविष्ट केले आहे. वापरकर्ते जी NVIDIA चे MCP55 मदरबोर्ड चीपसेट व परस्परबोर्डवरील NIC वापरतात त्यांच्याकर्ता महत्वाच्या त्रूटींचे निर्धारण आहे.
ixgb ड्रायवर: नुकतेच अपस्ट्रीमवरील सुधारीत (1.0.126) आवृत्तीत अद्ययावत झाले.
netxen_nic ड्रायवर: NetXen 10GbE संजाळ कार्डस् समर्थित करण्याकरीता आवृत्ती 3.4.2-2 समाविष्ट केली आहे .
Chelsio 10G इथरनेट संजाळ नियंत्रक आता समाविष्टीत केले आहे.
s2io साधणामध्ये PCI त्रूटी निर्धारणकरीता समर्थन समाविष्ट करण्यात आले आहे.
ब्रॉडकॉम बिनतारी इथरनेट ड्रायवर आता nx6325 कार्डकरीता. PCI ID चे समर्थन करतो.
BCM4306 ला ifup च्या द्वारे सुरू करतेवेळी उदयास येणाऱ्या ASSERTION FAILED त्रूटीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या बगचे निर्धारण करण्यात आले आहे.
ixgb ड्रायवर: Intel 10-gigabit इथरनेट कार्ड करीता EEH PCI त्रूटी निर्धारणचे समाविष्टन ह्या अद्ययावतात केले गेले आहे. अधिक माहितीकरीता, /usr/share/doc/kernel-doc-<kernel version>/Documentation/pci-error-recovery.txt यावर जावे.
qla3xxx ड्रायवर: QLogic iSCSI चा वापर न करणाऱ्या अडॅपटरांकरीता संजाळवरील आधार प्रदानकरण्यासाठी ड्रायवर चे पुनः-समर्थन व अद्ययावतन 2.03.00-k3 ह्या सुधारीत आवृत्ती द्वारे करण्यात आले आहे.
Intel PRO/Wireless 3945ABG संजाळ ड्रायवर: चे 1.2.0 आवृत्तीत अद्ययावतन झाले. यामुळे अनेक मुद्दे निर्धारीत झाले आहे,व काही लॅपटॉपवरील विशिष्ट स्तिथीत सुरक्षितेसंबंधी उदयास येणारी बगचे निर्धारण देखील ह्या अद्ययावतात समावेश आहे.
qla2xxx: ड्रायवरची 8.01.07-k6 ही सुधारीत आवृत्ती आहे. यात बरेचशे बदल आहेत, प्रमुख्याने:
iIDMA आता समर्थित आहे
खालिल फायबर गुणधर्म आता समर्थित आहे:
प्रतिकृती नोडचेनाव
प्रणाली यजमान
फाबरीकचे नाव
यजमानाचे पोर्ट स्तिथी
trace-control async घटना यापुढे संचयीत केली जाणार नाही
पुनः हाताळनी संबंधी तर्क ठीक केल्या गेला आहे
MSI-X is आता समर्थित आहे
IRQ-0 कार्य प्रत्येक प्रणालीस हाताळली जाते
NVRAM अद्ययावत जटपटरीत्या प्रभावी ठरतात
ह्या प्रकाशनात IPMI ड्रायवर संचचा अद्ययावत आहे , ज्यात 2.6.21.3 आवृतीचे अपस्ट्रीमधील बदल, व काही 2.6.22-rc-4. पासून पॅच समाविष्ट केले आहे. ह्या अद्ययावतात खालिल बदल (इतरांपैकी) आढऴतात:
ipmi_si_intf मधील निश्चित न केलेला डेटा बगचे निर्धाण झाले आहे
जोपर्यंत दूसरे ड्रायवर इंटरप्पट समर्थित नाही तोपर्यंत kipmid सुरू होत नाही
force_kipmid द्वारे समर्थित कर्नल डीमन यास वापरकर्ते आता पुनः वापरू शकता
प्रत्येक मार्गे आदेश पंजीकृत आता समर्थित आहे
MAX_IPMI_INTERFACES या पुढे वापरल्या जात नाही
सक्रिय प्रणाली संवादपट काढून टाकणे आता समर्थित आहे
फर्मवेअर अद्ययावत समर्थन करीता सुस्थितीत माध्यम समाविष्ट केले आहे
pigeonpoint IPMC करीता poweroff समर्थन समविष्टीत केले आहे
BT उप ड्रायवर आता जास्तवेळ टाइमआउट सहन करण्यास सक्षम आहे
हॉट रीमुवच्या व्यवस्थित हाताळणीकरीता pci_remove समाविष्ट केले आहे
नवीन घटकातील उपघटकांविषयी अधिक माहितीकरीता/usr/share/doc/kernel-doc-<kernel version>/Documentation/IPMI.txt वर जावे.
Red Hat Enterprise Linux 4 पासून ह्या प्रकाशनात SCSI ची दोषीतयादी पोर्ट करा.
aic79xx ड्रायवरकरीता PCI IDs समाविष्ट करा.
aacraid ड्रायवर: PRIMERGY RX800S2 वRX800S3ला समर्थित करण्याकरीता 1.1.5-2437 आवृत्तीस अद्ययावत करण्यात आले.
megaraid_sas ड्रायवर: 3.10 आवृत्तीस अद्ययावत केले आहे. ही अद्ययावत bios_param करीता प्रवेश निश्चित करतो, IOCTL स्मृती वाढवितो, व बरेचश्या किर्कोळ बगचे सुद्धा निर्धारण करतो.
Emulex lpfc ड्रायवर: 8.1.10.9 आवृत्तीस अद्ययावत केले आहे. ह्या अद्ययावतात बरेचश्या बदल आहेत, प्रमुख्याने :
ioctl मार्गातील host_lock चे व्यवस्थापनाचे निर्धारण केले आहे
AMD चीपसेच आता आपोआप ओळखली जाते, व DMA ची क्षमता 1024 बाईटस् पर्यंत कमी करतो
शोध सक्रीय असल्यास dev_loss_tmo च्यावेळी नोडस् काढली जात नाही
8GB पर्यंतचे लिंकचे वेग आता समर्थित आहे
खालिल बदल लागू करण्याकरीता qla4xxx ड्रायवर अद्ययावत केले आहे:
IPV6, QLE406x व ioctl घटकास समर्थन समाविष्टीत केले आहे
लॉकअपला कारणीभूत mutex_lock करीता बगचे निर्धारण झाले आहे
संवादपट दाखल करतेवेळी/न करतेवेळी qla4xxx व qla3xxx संबंधी मुद्दे आता निर्धारीत झाले आहे
mpt fusion ड्रायवर: 3.04.04 आवृत्तीस अद्ययावत केले आहे. ह्या अद्ययावतात बरेच बदल आहेत, प्रमुख्याने:
बरेचश्या त्रूटी हाताळणीसंबंधी बग्चे निर्धारण केल्या गेले आहे
mptsas आता एकापाठोपाठ लक्ष्य पुनः निश्चित करते
mptsas व mptfc करीता आता LUNs व 255 पेक्षा अधिक चे समर्थन आहे
खूपच हळू DVD ड्रायवर कार्यक्षमतेस कारणीभूत LSI mptspiड्रायवर मुद्दा निर्धारीत केला गेला आहे
LSI SCSI साधन BUSY चा स्थिती दर्शवितेवेळी, बरेच प्रयत्नांनंतर I/O अयशस्वी होत नाही
स्वतः-पुनः बिल्ड नंतर RAID अर्रे या वेळे पासुन उपल्बध नाही
arcmsr ड्रायवर: Areca RAID नियंत्रकास समर्थन पुरविण्याकरीता समाविष्ट केले आहे.
3w-9xxx घटक: 3ware 9650SE योग्यरीत्या समर्थित करण्याकरीता अद्ययावत झाले.
1.48aRH आवृत्तीस CIFS क्लाएंटचे अद्ययावत झाले. हे 1.48a प्रकाशनास आधारीत आहे, ज्यामध्ये खालिल बदल आहेत:
माऊंट पर्याय sec=none एका अनोळखी माऊंट निकालास येतो
POSIX वाढीव कार्यक्रम समर्थित केल्यास CIFS umask ला गृहीत घेतो
माऊंट पर्याय जे पॅकेट स्वाक्षरीस sec= विनंती करते आता निर्धारीत आहे
लक्ष्यात घ्या, EMC Celerra वापरकर्ते (NAS Code 5.5.26.x व त्या खालिल), EMC NAS वरील सहभागीय विभागस प्रवेश प्राप्तकरतेवेळी CIFS स्तबध होतो. हा मुद्दा खालिल कर्नल संदेशा द्वारे दर्शविले जाते:
kernel: CIFS VFS: सर्वर प्रतिसाद देत नाही kernel: CIFS VFS: cmd 162 mid 380 करीता प्रतिसाद नाही kernel: CIFS VFS: Mid=384 करीता RFC1001 आकार 135 SMB पेक्षा मोठा आहे
CIFS माऊंट नंतर, माऊंटपॉईंट वरील कुठलिही फाइल वाचतेवेळी/लिहीतेवेळी अडचन येते व कुठलेही कार्यक्रम जे I/O माऊंटपॉईंटवरील माऊंट करण्याचा प्रयत्न करतेवेळी स्तब्ध होतो. ह्याचे निर्धारण करण्याकरीता, NAS कोड 5.5.27.5 किंवा पुढील सुधारणा करा (EMC Primus चा emc165978 नंबर वापरा).
MODULE_FIRMWARE टॅग्स् आता समर्थित आहे.
ICH9 नियंत्रक आता समर्थित आहे.
Greyhound प्रोसेसर आता CPUIDवापरांमधील आता समर्थित आहे.
Oprofile आता नविन Greyhound कार्यक्षम काउंटर घटनांकरीता समर्थित आहे.
z/VM वापरणी प्रगत करण्याकरीता Directed DIAG आता समर्थित आहे.
Intel चायाचित्र चीपसेच आता DRM कर्नल घटका द्वारे समर्थित आहे. पुढे, सरळरीत्या रेंडरींग समर्थन देण्याकरीता DRM API ची 1.3 अशी सुधारीत आवृत्ती काढण्यात आली.
ACPI च्या पॉवर व्यवस्थापन करीता अद्ययावत S3 suspend-to-RAM वर S4 हायबरनेट अधिक कार्यक्षम झाले आहे.
gaim आता pidgin ह्या स्वरूपात ओळखले जाते.
Intel microcode चे अद्ययावत 1.17 आवृत्तीच्या रूपात आहे. यामुळे नविन Intel प्रोसेसर करीता समर्थन मिळते .
EMC Clariion संचयन वरील आंतरीक सक्रीय-सक्रीय dm-multipath वापरतेवेळी फेलओवर आता समर्थित आहे.
चायनीज् फांट Zysong या वेऴी पासुन fonts-chinese संकुलाचा भाग म्हणून प्रतिष्ठीत केला जात नाही. Zysong आता स्वतंत्ररीत्या fonts-chinese-zysong चा संकुल बनविला जातो. fonts-chinese-zysong संकुल अगाऊ CDत आढळतो.
लक्षात घ्या fonts-chinese-zysong संकुल Chinese National Standard GB18030 ला समर्थन देण्यकरीता जरूरी आहे.
Challenge Handshake Authentication Protocol (CHAP) वापरकर्ता व पासवर्ड ची 256 अक्षरांपर्यंत सीमा आहे.
pump चा ह्या अद्ययावतात वापर नाहीसा केला आहे. तरी, संजाळ संवादपट netconfig च्या सहाय्याने तुटक ifcfg स्क्रीप्टस् उदयास येऊ शकतात.
त्याच्या व्यतिरिक्त संजाळ संवादपट, संरचीत करण्याकरीता, system-config-network चा वापर करा. अद्ययावत system-config-network संकुलाचे प्रतिष्ठापन netconfig ला काढून टाकतो.
या पुढे rpm --aid समर्थित नाही. संकुल अद्ययावत व प्रतिष्ठपित करतेवेळी आपण yum चा वापर कराल असे सुचविले जाते.
तंत्रज्ञान पूर्वदर्शन वैशिष्ट्ये सध्या Red Hat Enterprise Linux 5.1 च्या सभासदत्वात समर्थित नाहीत, ती कार्यशीलतेच्या दृष्टीने पूर्ण नसावित, आणि सामान्यतः उत्पादन वापरासाठी योग्य नाहीत. तरीही, ही वैशिष्ट्ये ग्राहकाच्या सोयीसाठी आणि वैशिष्ट्यास विस्तीर्ण प्रदर्शनासह पुरवण्यासाठी समाविष्ट केली आहेत.
ग्राहकांसाठी ही वैशिष्ट्ये गैर-उत्पादन पर्यावरणात उपयुक्त ठरू शकतात. ग्राहक तंत्रज्ञान पूर्वदर्शन वैशिष्ट्यांसाठी ते पूर्णतः समर्थित होण्याआधी प्रतिसाद आणि कार्यशीलता सुचना देण्यासदेखील मुक्त आहेत. अतिउपद्रवी सुरक्षा मामल्यांसाठी एराटा पुरवले जातील.
तंत्रज्ञान पूर्वदर्शन वैशिष्ट्याच्या विकास प्रक्रियेत, अतिरिक्त घटक लोकांस तपासणीसाठी उपलब्ध होऊ शकतात. यात Red Hat तंत्रज्ञान पूर्वदर्शना वैशिष्टांस भावी प्रकाशनांत पूर्ण समर्थन देण्याचा चा विचार आहे.
Stateless Linux हा प्रणाली कशी चालवावी आणि व्यवस्थापित करावी यादृष्टीने विचार करण्याचा नविन मार्ग आहे, जो मोठ्या प्रमाणावरील प्रणाल्यांस सहज बदलण्यायोग्य करून त्यांचा पुरवठा आणि व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी रचला आहे. हे प्राथमिकतः तयार प्रणाली प्रतिमा, ज्या मोठ्या प्रमाणावरील स्थितीविहीन प्रणाल्यांमध्ये प्रतिलिपीत आणि व्यवस्थापित होतात, स्थापित करून कार्यकारी प्रणालीस फक्त-वाचन या प्रकारात सुरू करून साधले जाते (कृपया अधिक माहितीसाठी /etc/sysconfig/readonly-root चा संदर्भ घ्या).
विकासाच्या सद्यस्थितीत, स्थितीविहीन वैशिष्ट्ये अपेक्षित लक्ष्याचे उपसंच आहेत. या तऱ्हेने, या क्षमतेस तंत्रज्ञान पूर्वदृश्य असे संबोधले जात आहे.
खालील यादी Red Hat Enterprise Linux 5 मध्ये असलेल्या प्रारंभिक क्षमतांची आहे:
stateless प्रतिमा NFS वर चालवणे
स्थितीविहीन प्रतिमा NFS वर लूपबॅक मार्फत चालवणे
iSCSI वर चालवणे
हे अत्यंत शिफारसीय आहे कि ज्यांना स्थितीविहीन कोड परिक्षणात(टेस्टींग) रस असेल त्यांनी http:// fedoraproject.org/wiki/StatelessLinuxHOWTO येथे HOWTO वाचावे आणि stateless-list@redhat.com येथे जुळावे.
अस्तरीय लीनक्स करीता योग्यत्या गरजांचे समर्थन सर्वप्रथम Red Hat Enterprise Linux 5 मध्ये परिचयास आली.
AIGLX हे एरवी पूर्णतः समर्थित X सेवकाचे तंत्रज्ञान पूर्वदर्शन वैशिष्ट्य आहे. हे मानक डेस्कटॉपवर GL-संवेगीत प्रभाव देण्यावर लक्ष देते. प्रकल्पात खालील बाबींचा समावेश होतो:
हलकेच बदललेला X सेवक
अद्ययावत Mesa संकुल जे नविन प्रोटोकॉल समर्थन जमा करते
हे घटक प्रतिष्ठापित केल्याने, तुम्हास खूप कमी बदलांसह GL-संवेगीत प्रभाव तुमच्या डेस्कटॉपवर मिळू शकतात, तसेच त्यांना तुमचा X सेवक बदली न करता कार्यान्वित किंवा अकार्यान्वित करण्याची क्षमता मिळेल. AIGLX हार्डवेयर GLX संवेगाचा लाभ घेण्यासाठी दूरस्थ GLX अनुप्रयोगदेखील कार्यान्वित करतो.
devicescape स्टॅक iwlwifi 4965GN बिनतारी ड्रायवर समर्थित करतो. ही स्टॅक विशिष्ट बिनतारी साधणांना कुठल्याही Wi-Fi संजाळास संपर्क साधण्यास सहकार्य करतो.
स्टॅक एका कोडबेसआधारीत आहे जी अजून अपस्ट्रीम स्वीकारल्या जायची आहे. ह्याच्या व्यतिरीक्त, ह्या स्टॅक ची सुस्तिथी तपासणी द्वारेचे केली जाते.तरी, ह्या स्टॅकला ह्या प्रकाशनात तंत्रज्ञान पूर्वदृश्यच्या स्वरूपात समाविष्ट केले गेले आहे.
FS-Cache ही दूरस्थ फाइल प्रणाल्यांसाठी स्थानिक कॅशींग सुविधा आहे; ती उपयोक्त्यांस NFS डेटा स्थानिकरित्या आरोहित डिस्कवर कॅश करण्याची सोय देते. FS-Cache सुविधा सेटअप करण्यासाठी, cachefilesd RPM प्रतिष्ठापित करा आणि /usr/share/doc/cachefilesd-<version>/README मधील सुचनांचा संदर्भ घ्या.
<version> ला प्रतिष्ठापित करावयाच्या cachefilesd संकुलाच्या संबंधित आवृत्तीने बदला.
Systemtap लीनक्स प्रणाली चालवण्याविषयी माहिती गोळा करणे सोपे करण्यासाठी मुक्त सॉफ्टवेयर (GPL) इन्फ्रास्ट्रक्चर पुरवते. हे कामगिरी किंवा कार्यशीलता समस्येचे निदान करण्यात मदत करते. systemtap च्या मदतीने, विकासकांस माहिती गोळा करण्यासाठी यापुढे कष्टदायी आणि खीळ बसवणाऱ्या इंस्ट्रूमेंट, रीकंपाइल, प्रतिष्ठापन आणि रीबूट या मालिकेतून जावे लागणार नाही.
लीनक्स लक्ष्य (tgt) फ्रेमवर्क प्रणालीस ब्लॉक-स्तरीय SCSI संचयनतर्फे इतर प्रणालींकरीता जी SCSI प्रबंधक समर्थित आहे त्यांस सेवा प्रदान करण्यास परवानगी देतो. ही कार्यशैली सुरूवातीला लीनक्स iSCSI लक्ष्यास निश्चित केली आहे, जे संजाळावरील कुठलेही iSCSI प्रबंधकाकरीता संचयनास पात्र ठरवू शकते.
iSCSI लक्ष्य संरचीत करण्यकरीता, scsi-target-utils RPM प्रतिष्ठापीत करा व खालील नीयम पहा:
/usr/share/doc/scsi-target-utils-<version>/README
/usr/share/doc/scsi-target-utils-<version>/README.iscsi
<version> ला प्रतिष्ठापित करावयाच्या संकुलाच्या संबंधीत आवृत्तीशी बदला.
अधिक माहितीकरीता, man tgtadm पहा.
firewire-sbp2 घटक ह्या अद्ययावतात तंत्रज्ञान पूर्वदृश्य ह्या स्वरूपात समाविष्टीत आहे. हा घटक फायरवायर संचयन साधणांकरीता व स्कॅनरकरीता संपर्क समर्थित करतो.
सध्या, फायरवायर खालिल समर्थित करत नाही:
IPv4
pcilynx यजमान नियंत्रक
multi-LUN संचयन साधणे
संचयन साधणांकरीता विशेष प्रवेश नाही
या व्यतिरीक्त, खालिल मुद्दे फायरवायरच्या ह्या आवृत्तीत आवर्जून आढळतात:
SBP2 ड्रायवर मधील स्मृतीची गऴती प्रणालीला स्तब्ध करू शकते.
ह्या आवृत्तीतील कोड big-endian प्रणालींवर व्यवस्थित काम करत नाही. यामुळे PowerPC ची अनिश्चित वागणूक आपल्याला पहायला मिळते.
बूट प्रक्रिया व पुनः सुरू होण्यापूर्वी त्रूटी दर्शवितेवेळी SATA समर्थित प्रणालीला तातपुरते थांबविणारी SATA त्रूटीचे आता निर्धारण झाले आहे.
बहू-बूट प्रणालीत, parted सुरूवातीचे काही सेक्टर जप्त करून घेतो ज्यावर Windows Vista™ प्रतिष्ठपीत केले गेले आहे. तरी, multi-boot प्रणाली दोगांशी Red Hat Enterprise Linux 5.1 सह व Windows Vista™ संरचीत करतेवेळी, दूसरा व शेवटचा पर्यायी कार्यप्रणाली बूटेबल नाही असे माहिती पडते.
rmmod xennet या पुढे domU च्या स्तब्धतेसाठी कारणीभूत ठरत नाही.
4-socket AMD Sun Blade X8400 Server Module प्रणाली जिला node 0 मध्ये स्मृती रचित नाही यापुढे बूट होतेवळी पॅनिक होत नाही.
conga व luci चा उपयोग फेलओवर क्षेत्र बनविण्याकरीता व संरचीत करण्याकरीता वापरल्या जाऊ शकतो.
Cluster Storage गूटाचे yum द्वारे प्रतिष्ठपन केले जातेवेळी, कार्यक्रम अयशस्वीरीत्या खंडीत पडत नाही.
प्रतिष्ठापनेवेळी, चुकीचे SELinux चा संदर्भ या पुढे /var/log/faillog व /var/log/tallylogकरीता कधीच लागू होत नाही.
विभाजित प्रतिष्ठापन माध्यम (उदाहरणार्थ, CD किंवा NFSISO) वापरून Red Hat Enterprise Linux 5.1 चे प्रतिष्ठापन करताना, amanda-server च्या प्रतिष्ठापनेवेळी चूक उद्भवते.
EDAC यापुढे अलीकडील k8 प्रोसेसरांवरील बिनचूकरीत्या स्मृत्तीच्या वापराविषयी तपशील देतो.
दूरून ग्नोम डेस्कटॉंपवर gdm द्वारे प्रवेश करण्याकरतेवेळी प्रवेश स्क्रीन या पुढे स्तब्ध होत नाही.
autofs मधील त्रुटी ज्यामुळे multi-mounts ची कार्यक्षमता स्थगीत झाली होती आता निर्धारीत झाली आहे.
tvtime आणि xawtv यांनाbttv कर्नल मॉड्यूलसह वापरतेवेळी यापुढे यंत्रणा स्तब्ध होत नाही.
utrace करीता अनेक पॅट्चेस खालिल निर्धारण आत्मसात करतात:
ptraceचा वापर करतेवेळी रेस स्तिथीस कारणीभूत ठरणाऱ्या बूगचे निर्धारण झाले आहे
काही PTRACE_PEEKUSR तर्फे कार्यक्रम चालवतेवेळी उदयास येणाऱ्या EIO त्रूटीचे निर्धारण करण्यात आले आहे
उपकार्यक्रम विशिष्ट स्तिथीतून अकस्मात बाहेर पडल्यास wait4 कडून होणाऱ्या काही त्रूटीचे निर्धारण करण्यात आले आहे
कधी कधी SIGKILL केल्यावर कार्य पूर्णपणे यशस्वीरीत्या बंद होत नाही तरी त्यासंबंधी अडचन निर्धारीत करण्यात आली आहे. हे ptrace काही विशिष्टरीत्या वापरल्या गेले असावे.
ज्यामुळे सावधगिरीची घंटा व वारंवार येणाऱ्या RTC खंड अकार्यक्षम होतो अश्या RealTime Clock (RTC) बगचे निर्धारण झाले आहे.
पहिल्यावेळी एनाकोंडामधील बटणावर क्लिक केल्यावर, पडद्यावर प्रकाशन टिपा उशिराने दर्शवितो असे लक्षात येते. उशिर होतेवेळी, एक रिक्त यादी चौकटीत दिसते. दृश्य पटकणच डोळ्यासमोर दिसते, त्यामुळे बरेचशे वापरकर्त्यांना हा फरक दिसून पडत नाही.
हा विलंब जास्तवेळी ह्या कारणामुळे होतो की संकुल प्रतिष्ठापनाचा कार्यकाळ हा CPU-केंद्रीत सर्वात जास्त वेळ घेणारा कार्यकाळ आहे.
काही मशीनी ज्या NVIDIA आलेखी कार्ड वापरतात त्या भ्रष्ट आलेखी किंवा फॉन्ट दाखवू शकतात आलेखी प्रतिष्ठापक वापरताना किंवा आलेखीय लॉगीनदरम्यान. यावर उपाय म्हणून, आभासी कन्सोलवर स्विच करा आणि परत मूळ X यजमानावर या.
MegaRAID ड्राइवर वापरणाऱ्या यजमान बस अडाप्टरांस "मोठा संग्रह" इम्यूलेशन रितीवरच निर्धारित करावे, "I2O" इम्यूलेशन रितीवर नाही. हे करण्यासाठी खालील क्रिया करा:
MegaRAID BIOS Set Up उपयुक्तता दाखल करा.
अडाप्टर रचना मेनू दाखल करा.
इतर अडाप्टर पर्याय अंतर्गत, इम्यूलेशन निवडा आणि त्यास मुख्य संग्रह येथे नियोजित करा.
जर अडाप्टर चुकून "I2O" इम्यूलेशनवर निर्धारित केला असेल, तर प्रणाली i2o ड्राइवर लोड करण्याचा प्रयत्न करेल. हे असफल होईल, आणि योग्य ड्राइवर भारित होण्यापासून रोखेल.
Red Hat Enterprise Linux ची मागील प्रकाशने सहसा MegaRAID ड्राइवरच्या आधी I20 ड्राइवर भारित करण्याचा प्रयत्न करत नाहीत. याच्या असंबंध, हार्डवेयर कधीही Linux बरोबर वापरले जात असताना "मोठा संग्रह" इम्यूलेशन रितीवर निर्धारित केलेले असावे.
Cisco Aironet MPI-350 बिनतारी कार्ड असलेले लॅपटॉप तारेवरील इथरनेट पोर्ट वापरून एखादे संजाळ-आधारित प्रतिष्ठापन करण्यादरम्यान DHCP पत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात हँग होऊ शकतात.
यावर उपाय म्हणून, प्रतिष्ठापनेसाठी तुमचे स्थानिक माध्यम वापरा. वैकल्पिकरित्या, तुम्ही बिनतारी कार्ड प्रतिष्ठापनेपूर्वी लॅपटॉप BIOS मध्ये अकार्यान्वित करू शकता (प्रतिष्ठापनेनंतर तुम्ही बिनतारी कार्ड पुन्हा कार्यान्वित करू शकता).
सध्या, system-config-kickstart संकुल निवड किंवा नापसंती समर्थित नाही. system-config-kickstart वापरत असताना, संकुल निवड पर्याय तो अकार्यान्वित असल्याचे दर्शवतो. याचे कारण system-config-kickstart समुह माहिती गोळा करण्यासाठी yum चा वापर करतो, परंतु yum ला Red Hat संजाळ शी जोडण्यासाठी व्यूहरचित करण्यास तो असमर्थ आहे.
या घडीला, तुम्हास तुमच्या किकस्टार्ट फाइलींमधील संकुल विभाग स्वहस्ते बदलावे लागतील. किकस्टार्ट फाइल उघडण्यासाठी system-config-kickstart वापरताना, ते त्यातील सर्व संकुल माहिती प्रतिरक्षित करेल आणि तुम्ही सुरक्षित केल्यावर ते लिहून ठेवेल.
/var/log/boot.log फाइलमध्ये बूट-प्रसंगी प्रवेश Red Hat Enterprise Linux 5 च्या प्रकाशनात उपलब्ध नाही.या भावी अयावद्यतना परस्पर कार्यशीलता जोडली जाईल.
Red Hat Enterprise Linux 4 पासून Red Hat Enterprise Linux 5 वर सुधारणा करताना, जमावट मार्गदर्शक आपोआप प्रतिष्ठापित होत नाही. तुम्हास pirut वापरावे लागते.
प्रणाली kexec/kdump कर्नलमध्ये यशस्वीरित्या रीबूट होणार नाही जर X चालू असेल आणि vesa ऐवजी अन्य ड्राइवर वापरत असेल. ही समस्या फक्त ATI Rage XL आलेखीय चिपसंचासह अस्तित्वात होते.
जर X ;चालत असेल ATI Rage XL धारी प्रणालीवर, तर खात्री करा की तो vesa ड्राइवर वापरतो यशस्वीरित्या kexec/kdump कर्नलमध्ये रीबूट करण्यासाठी.
आभासीकरण वैशिष्ट्य प्रतिष्ठापित करणे नमुना क्रमांक xw9300 आणि xw9400 च्या HP प्रणाल्यांवर time went backwards या सुचनेस कारणीभूत होऊ शकते.
या समस्येवर xw9400 मशीनींवर उपाय म्हणून, BIOS रचनांस HPET टाइमर कार्यान्वित करण्यास व्युहरचित करा. नोंद करा की हा पर्याय xw9300 मशीनींवर उपलब्ध नाही.
ह्याचे निर्धारण HP द्वारे भावी BIOS अद्ययावतात होईल.
nVidia CK804 चिपसेट प्रतिष्ठापित असलेल्या मशीनवर Red Hat Enterprise Linux 5 वापरताना, तुम्हास खालीलप्रमाणे कर्नल संदेश मिळू शकतात:
kernel: assign_interrupt_mode Found MSI सुस्तिथी kernel: pcie_portdrv_probe->Dev[005d:10de] मध्ये अवैध IRQ. BIOS विक्रेत्याशी तपासनी करा
हे संदेश दर्शवतात की विशिष्ट PCI-E पोर्ट IRQs ची विनंती नाही करत आहेत. पुढे, हे संदेश कोणत्याही प्रकारे मशीनच्या कामावर दुष्परिणाम करत नाहीत.
सहजरीत्या काढूशकणाऱ्या संचयन साधण (उदाहणार्थ CDs व DVDs) काहीवेळा आपण रूट द्वारा प्रवेशकेल्यावर आपोआप माउंट होत नाही. तरी, आपल्याला छायाचित्राद्वारे फाइल व्यवस्थापक च्या मदतीने साधण माउंट करावे लागेल.
याच्या व्यतिरिक्त, साधणास /media वरील माउंट करण्याकरीता आपण खालिल आदेशचा वापर करू शकता:
mount /dev/<device name> /media
ह्या अद्ययावतात Calgary IOMMU चीप मूलभूतरीत्या समर्थित नाही. हे करण्यकरीता, कर्नलवरील आदेश ओळीवरून iommu=calgary पर्याय नोंदणीकृत करा.
IBM System z पारंपारिक Unix-शैलीचा भौतिक कन्सोल पुरवत नाही. यामुळे, IBM System z साठी Red Hat Enterprise Linux 5 प्रारंभिक कार्यक्रम भारणावेळी firstboot कार्यशीलता समर्थित करत नाही.
IBM System z वर Red Hat Enterprise Linux 5 योग्यरित्या व्यवस्थित करण्यासाठी, प्रतिष्ठापनेनंतर खालील आदेश चालवा:
/usr/bin/setup — setuptool संकुलाद्वारे पुरवलेले आहे.
/usr/bin/rhn_register — rhn-setup संकुलाद्वारे पुरवलेले आहे.
Red Hat Enterprise Linux 5 पासुन Red Hat Enterprise Linux 5.1 पर्यंत Red Hat संजाळ द्वारे सुधारणा करतेवेळी, yum redhat-beta कळ आयात करण्यास आपल्या खबरदार करेल याची खात्री नाही. तरी, आपण स्वतः वरील redhat-beta कळ सुधारणा होण्या पहिले आयात करावे असे सुचविले जाते. याकरीता, खालिल आदेश चालवून पहा:
rpm --import /etc/pki/rpm-gpg/RPM-GPG-KEY-redhat-beta
संरचीत फाईलरवरील, LUN ला काढून टाकल्यास, यजमानात हे बदल परस्पर आढळूण येत नाही. या स्तिथीत, lvm आदेश dm-multipath वापरतेवेळी सक्रीय राहणार नाही, तरी यावेळी LUN अकार्यक्षम झाले आहे.
यावर काम करण्याकरीता, सर्व साधणे व /etc/lvm/.cache मधील LUN करीता mpathवरील नोंदणीकृत लिंक काढून टाका.
नोंदणीकृत विषयी अधिक माहिती करीता, खालील आदेशचा वापर करा:
ls -l /dev/mpath | grep <stale LUN>
उदाहणार्थ, <stale LUN> 3600d0230003414f30000203a7bc41a00 असल्यास, खालिल परिणाम आपणास दिसू शकतील:
lrwxrwxrwx 1 root root 7 Aug 2 10:33 /3600d0230003414f30000203a7bc41a00 -> ../dm-4 lrwxrwxrwx 1 root root 7 Aug 2 10:33 /3600d0230003414f30000203a7bc41a00p1 -> ../dm-5
याचा अर्थ 3600d0230003414f30000203a7bc41a00 mpath दोन लिंक्स करीता निश्चित केले आहे: dm-4 व dm-5.
तरी, खालिल ओळी /etc/lvm/.cache पासून पुसून टाकण्यात यावे:
/dev/dm-4 /dev/dm-5 /dev/mapper/3600d0230003414f30000203a7bc41a00 /dev/mapper/3600d0230003414f30000203a7bc41a00p1 /dev/mpath/3600d0230003414f30000203a7bc41a00 /dev/mpath/3600d0230003414f30000203a7bc41a00p1
CD / DVD पासून पूर्णतः आभासित Windows™ अतिथी निर्माण करतेवेळीत् करताना, अतिथी प्रतिष्ठापनाचा दूसरा टप्पा रीबूट केल्यानंतर चालणार नाही.
यावर उपाय म्हणून, /etc/xen/<name of guest machine> योग्यरित्या CD / DVD यंत्रासाठी नोंद दाखल जोडून संपादा.
जर साध्या फाइलवर प्रतिष्ठान आभासी यंत्र म्हणून वापरले असल्यास, /etc/xen/<name of guest machine> ची disk ओळ खालीलप्रमाणे दिसेल:
disk = [ 'file:/PATH-OF-SIMPLE-FILE,hda,w']
यजमानावर /dev/dvd म्हणून स्थित DVD-ROM यंत्र प्रतिष्ठापनाच्या टप्पा २ साठी 'phy:/dev/dvd,hdc:cdrom,r' सारखी नोंद दाखल करून hdc म्हणून उपलब्ध करून दिले जाऊ शकते. यामुळे, disk ओळ आता खालीलप्रमाणे दिसेल:
disk = [ 'file:/opt/win2003-sp1-20061107,hda,w', 'phy:/dev/dvd,hdc:cdrom,r']
तंतोतंत यंत्र मार्ग तुमच्या होर्डवेयरवर अवलंबून बदलू शकतात.
sctp घटक कर्नल मध्ये समाविष्ठीत न केल्यास, व netstat ला -A inet सह किंवा -A inet6सह वापरल्यास कर्नल अयशस्वीरीत्या बंद पडतो व खालिल संदेश दर्शवित :
netstat: `AF INET (sctp)' करीता ह्या कार्यप्रणालीवर आधार नाही.
हे वगळण्याकरीता, sctp संकुले प्रतिष्ठापित करा.
Red Hat Enterprise Linux 3.9 चे पूर्णतः आभासी अतिथी खात्यावर प्रतिष्ठापन खूपच हुळूवारपणे होऊ शकते. याच्या व्यतिरीक्त, प्रतिष्ठापनेनंतर अतिथी खाते बूट केल्यासhda: lost interrupt त्रूटी येण्याची शक्यता आहे.
ही बूट त्रूटी नाहीसी करण्यासाठी, अतिथी खाते SMP कर्नल वापरण्यास संरचीत करा.
बूट कार्यकाळास सीरीअल पोर्टसाठी छपाईच्या पहिले सध्या वापरणीत असलेले कर्नल Data Terminal Ready (DTR) संकेतास सक्रीयरीत्या लक्ष्य देत नाही. DTR सक्रीयतेची काही साधाणांना गरज असते, ज्यामुळे, कर्नल बूट संदेश या साधाणांवरील सीरीअल कंसोलवर छपाई केले जात नाही.
Red Hat Enterprise Linux 5 .1 करीता यजमान (dom0) प्रणालीस सुधारणा करतेवेळी Red Hat Enterprise Linux 4.5 SMP अभासी खाते बूट योग्य नाही असे दर्शवितो. ये जेव्हा यजमान प्रणालीवर 4GB पेकक्षा जास्त RAM असते तेव्हा मुख्यतः दिसते.
याच्यावर काम करण्याकरीता, प्रत्येक Red Hat Enterprise Linux 4.5 खाते एकमेव CPU माध्यमात बूट करा व त्यातील कर्नलला नुकत्याच प्रकाशीत झालेल्या आवृत्ती करीता(Red Hat Enterprise Linux 4.5.z साठी) सुधारीत करा.
काहीक प्रणालींवरील (जसे HP dc7700) AMD 8132 व HP BroadCom HT100 वापरल्या जाणारे MMCONFIG चक्रां करीता समर्थित नाही. आपली प्रणाली वरील कुठलिही चीपसेट वापरत असल्यास, PCI संचयानाने PortIO CF8/CFC पद्धती वापरायला हवी. हे संचयीत करण्यासठी, प्रणालीला -pci nommconfig कर्नल घटकाशी प्रतिष्ठापनेवेळी संरचीत करा व GRUB मध्ये बूट झाल्यावर pci=nommconf समाविष्ट करा.
पुढे, Message Signaled Interrupts (MSI) करीता AMD 8132 चीपसेटचे समर्थन नाही. आपली प्रणाली ही चीपसेट वापरल्यास, आपण MSI ला अकार्यान्वीत करा. ये करण्याकरीता, प्रतिष्ठापनेवेळी कर्नल घटकाचा -pci nomsi वापर करा व GRUB मध्ये बूच झाल्यावर pci=nomsi समाविष्टीत करा.
तरी, जर आपले विशिष्ट कार्यप्रणाली आधीपासूनच कर्नलच्या सदोष यादीत असेल, तर आपल्या प्रणालीकरीता वरील pci कर्नल घटकांची गरज लागणार नाही. खालिल HP कार्यप्रणाली पहिलेपासूनच कर्नलच्या सदोष यादीत आहेत:
DL585g2
dc7500
xw9300
xw9400
या प्रकाशनात समाविष्टीत Virtual Machine Manager (virt-manager) वापरकर्त्यांना आभासी अतिथी प्रतिष्ठापनाकरीता वाढीव बूट गुणधर्म समाविष्टीत करण्यास परवानगी देत नाही. ह्या बूट गुणधर्मांचे ठराविक प्रकारच्या हार्डवेअरवरील विशेष प्रकारच्या आभासी अतिथी खाते प्रतिष्ठपीत करतेवेळी सुद्धा गरज भासते.
हा मुद्दा virt-manager च्या भावी प्रकाशनात संबोधीत केला जाईल. आदेश ओळीवरून आभासी अतिथी खात्यांकरीता कर्नल घटके निश्चित करण्यासाठी, virt-install चा वापर करा.
मूलभूत dm-multipath संरचनेसह Netapp साधणे पूर्वीच्या अयशस्वी मार्गास संचयीत केलेले फेलबॅक पूर्णकरण्याकरीता बराच वेळ घेऊ शकतात. याचे निर्धारणाकरीता, multipath.conf फाइल वरील साधणे विभागास खालील Netapp साधण संरचना समाविष्ट करू शकता:
devices { device { vendor "NETAPP" product "LUN" getuid_callout "/sbin/scsi_id -g -u -s /block/%n" prio_callout "/sbin/mpath_prio_netapp /dev/%n" features "1 queue_if_no_path" hardware_handler "0" path_grouping_policy group_by_prio failback immediate rr_weight uniform rr_min_io 128 path_checker directio }
( amd64 )
[1] हा मजकूर फक्त Open Publication License, v1.0 मध्ये उद्धृत अटी आणि शर्तींनुसार वितरित केला जाऊ शकतो, जो http://www.opencontent.org/openpub/ येथे उपलब्ध आहे.